नंदादीप मेडिकल केअर तर्फे फॅको टिप्स 2.0 या 3D टीचिंग कोर्स कार्यशाळेचे आयोजन केले होते.
Admin | 08 Jul 2022Total Views : 999दृष्टी म्हणजे नंदादीप......
नंदादीप मेडिकल केअर तर्फे
सांगलीचे सुप्रसिद्ध डॉ.पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय चे मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ पटवर्धन यांनी फॅको टिप्स 2.0 या 3D टीचिंग कोर्स कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या 2 दिवसीय 3D कोर्स मध्ये लाइव्ह ऑपरेशन दाखवण्यात आले, तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिये वेळी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. सौरभ पटवर्धन सर, डॉ. निधी पटवर्धन मॅडम, डॉ. दीपक मेगुर सर आणि डॉ. भारती मेगुर मॅडम यांनी यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
या 2 दिवसीय कार्यशाळे साठी देशभरातून अनेक डॉक्टरांनी सहभाग घेतला तसेच अनेक डॉक्टरांनी विविध ऑनलाईन माध्यमांद्वारे देखील या कार्यशाळेचा लाभ घेतला.