नंदादीप आय हॉस्पिटलच्या "PhacoTips 5.0" शिबिरास तज्ज्ञ डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद
Admin | 25 Jun 2025Total Views : 246
नंदादीप आय हॉस्पिटल व नंदादीप मेडिकल केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित PhacoTips 5.0 या प्रगत फेकोइमल्सिफिकेशन प्रशिक्षण कार्यक्रमाला देशभरातून १०० हून अधिक डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही डॉक्टरांनी प्रत्यक्ष उपस्थिती दिली, तर अनेक डॉक्टरांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
या प्रशिक्षणात पुढील गोष्टींचा समावेश होता:
🔹 3D व्हिडिओच्या माध्यमातून शस्त्रक्रिया प्रशिक्षण
🔹 तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लाईव्ह सर्जरी
🔹 शंका निरसन सत्र व गेस्ट लेक्चर्स
🔹 तसेच, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी डॉ. दिलीप पटवर्धन यांचे विशेष व्याख्यान
डॉक्टरांसाठी व्यावसायिक कौशल्य वाढवतानाच मानसिक आरोग्यावरही लक्ष देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.
PhacoTips 5.0 हे नंदादीपच्या ज्ञानवृद्धीतील आणखी एक पाऊल आहे.